– मेघराज भोसले यांचा निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव
नागपुर : राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तांना निवेदन देऊन अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक हि नियमानुसार वेळेतच घ्यावी अशी मागणी केली आहे, चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष हे कोरोणा चे कारण पुढे करून मुद्दामून निवडणूक पुढं ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, महाराष्ट्रात आत्ताच करोना च्या सर्व अटी नियम पाळून ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका झाल्या व तसेच महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निवडणुका झाल्या,महाराष्ट्र शासनाने कोरोना संदर्भात अटी नियम दिल्या आहेत.
त्या पाळून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक ही वेळेत आणि शासनाच्या नियमानुसार घ्यावी, मोठमोठे निवडणुका जर नियम अटी पाळून होत असतील तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांची निवडणूक का होऊ शकत नाही, असे ही या निवेदनात म्हटले आहे, महामंडळाचे अध्यक्ष निवडणूक जाणीपूर्वक पुढे ढकलत आहेत, महामंडळाची निवडणूक खूपच सोप्या पद्धतीची आहे याठिकाणी फक्त मुंबई पुणे कोल्हापूर इतकेच निवडणुकीची सेंटर आहेत सभासद संख्या देखील मर्यादित आहे, त्यामुळे ही निवडणूक खूप सुटसुटीत आणि चांगली होऊ शकते, गेले अनेक वर्ष चित्रपट महामंडळाकडून एकही व्यवस्थित वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यात आली नाही संचालक मंडळाच्या मिटिंग त्या ठिकाणी नियमित होत नाही या बाबीकडे लक्ष घालावे.
असे सुद्धा या वेळी नमूद करण्यात आले आहे.तसेच चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांना संचालक मंडळाची मीटिंग लवकरात लवकर घ्यावी ती सुद्धा मुदत संपायच्या अगोदर तसेच संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये संचालकांनी मिळून, वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख सुद्धा जाहीर करावी, व महामंडळाच्या अध्यक्षांनी संपूर्ण 5 वर्षाचा अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवावा आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर कराव्यात असा आदेश आपण त्यांना द्यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे, या निवेदनात बाबासाहेब पाटील प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र यांच्या सह विजय पाटकर,प्रिया बेर्डे, संतोष साखरे,सविता मालपेकर,मिलिंद अस्टेकर, सुधीर निकम यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
Source link