मृतात १४ महिला व १२ पुरुषांचा समावेश, विना तांबे अंगणवाडी सेविका
कामठी: पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येसह कामठी तालुक्यात मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. कामठीत ७२ तासात एका अंगणवाडी कर्मचारी सह १५ तर गेल्या पाच दिवसात तब्बल २६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. यात ५० वर्षांवरील १६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १४ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला व १५५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. झपाट्याने वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे सक्रीय बधितांचा आकडा दोन हजार पर्यंत पोहोचला आहे.
कोरोनाने आता तालुक्यात पुन्हा चांगलेच हातपाय पसरले आहे. मागील वर्षभरात दर दिवसाला आढळून येणाऱ्या कोरोना बधितांच्या आकडेवारींचा रेकॉर्ड मोडला आहे. तालुक्यात गेल्या ७२ तासात गौतम नगर जुनी छावणी येथील ३५ वर्षीय विना धम्मरत्न तांबे या अंगणवाडी सेविकांच्या मृत्युसह १५ जणांचा तर गेल्या पाच दिवसात तब्बल २६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. शहरातील कोरोनाने घेतलेला अंगणवाडी सेविकेचा हा दुसरा बळी आहे. मृतांमध्ये कामठी शहरातील १५, कोराडी महादुला ६, रनाळा २ तर भिलगाव, गुमथी व गुमथळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
मृतकात १४ महिला व १२ पुरुषांसह ५० वर्षांवरील १६ जणांचा समावेश आहे. एखाद्या क्रिकेटच्या आकडेवारी प्रमाणे दर दिवसाला कोरोनाबधितांचा एक नवा विक्रम तयार होत आहे. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण प्रचंड गतीने वाढत आहेत.
आज तब्बल १५५ कोरोनाबाधित आढळून आले त्यात सर्वाधिक कोराडी, महादुला, रणाळा, येरखेडा, गुमथळा, गुमथी तर शहरातील मोंढा, नया बाजार, लुंबिनी नगर,न्यू खलाशी लाईन, मोदी पडाव, जुनी खलाशी लाईन, छत्रपती नगर, दाल ओळी नं १ व २, पेरकीपुरा, रमा नगर, गौतम नगर, फुटाना ओली, नेताजी चौक येथील रुग्णांचा समावेश आहे. तर तालुक्यातील ॲक्टिव रुग्णाची संख्या दोन हजाराच्या आसपास तर बळींची संख्या १८० वर पोहोचली आहे.
Source link