राज्य सरकारकडे सोपविणार अहवाल.
नागपूर: सोशल मीडियाचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा, यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणमध्ये पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आपले मत नोंदविणे अपेक्षित आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
आजच्या घडीला सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच करीत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सोशल मीडिया आता घराघरांत पोहोचला. त्यामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर होणेही अपरिहार्य झाले आहे. यातूनच आता सोशल मीडियाबाबत धडे अभ्यासक्रमात येणे आवश्यक झाले आहे. पालक, विद्यार्थी यांना याबाबत काय वाटतं?
यावर आता शहरातील सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी मंकी सर्व्हे या जगातील विविध विषयाचे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून सर्व्हे सुरू केला आहे. अजित पारसे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मीडियाचा अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी केली असून त्यास मुख्यमंत्री कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सोपविण्यात येणार आहे.
चारपैकी एक पर्याय निवडा
सोशल मीडिया वापर आणि प्रशिक्षण हा विषय हायस्कूलपासून असावा, असा मुद्दा सर्वेक्षणात मांडण्यात आला असून नागरिकांना हो, नाही, सांगता येत नाही, सांगू इच्छित नाही, असे चार पर्याय देण्यात आले आहे. यातून पर्यायावर क्लिक करायचे आहे.
असे नोंदविता येईल मत
सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी नागरिकांना htttps://www.surveymonkey.com/r/ajeetparse व www.ajeetparse.com या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. येथे नागरिकांना चार पर्याय देण्यात आले आहे, त्यापैकी एकावर क्लिक करून आपले मत नोंदविता येणार आहे.
सोशल मीडियाबाबत पूर्ण तांत्रिक माहिती काळाची गरज आहे. फसवणुकीचे प्रकार तसेच गुन्हे व अफवा पसरविण्यासाठी सोशल मिडियाचा गैरवापर होत आहे. हे टाळण्यासाठी किंवा बचावासाठी हायस्कूलपासून सोशल मीडिया हा विषय अभ्यासक्रमात आवश्यक आहे. तरच सोशल मीडिया जनसंवादाचे एक प्रमुख माध्यम म्हणून खऱ्या अर्थाने परिचित होईल. त्यामुळे प्रत्येकाने या सर्वेक्षणात आपले मत नोंदवावे.
– अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.ajeetparse.com
Source link