– देशी दारू ७२ निप, विदेशी ४८ निप एकुण १६,८०० रू चा मुद्देमाल जप्त
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत धरमनगर कन्हान येथे एक इसम आपल्याच घरी दारु विक्री करण्याची गुप्त माहिती कन्हान पोलीसांना मिळाल्याने पोलीसांनी आरोपीच्या घरी धाड मारून दारु विक्री करतांना आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी जवळुन देशी दारू व विदेशी दारू सह एकुण १६,८०० रुपया चा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१५) मे २०२१ ला रात्री ९:०० ते ९:३० वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांना दारू विक्रीची गुप्त माहिती मिळाल्याने कन्हान पोलीसांनी धाड मारून आरोपी लक्की उर्फ विजय भिमसिंग बैस रा. धरमनगर कन्हान हा दारू विकताना आढळुन आल्याने त्यांच्या घराची झडती मध्ये कंपाऊंड ला लागुन असलेल्या जिण्याचा खाली देशी दारू १८० एम एल च्या ७२ निपा व विदेशी दारू च्या १८० एम एल च्या ४८ निपा असा एकुण १६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशनचे पो उप नि सुनिल अंबरते यांचे लेखी तक्रारीने आरोपी लक्की उर्फ विजय भिमसिंग बैस विरुद्ध अप क्र १३९/२०२१ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी ला सुचना पत्रावर सोडण्यात आले. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक सुनिल अंबरते, साफौ. येशु जोसेफ, पोशि कृणाल पारधी, मंगेश सोनटक्के, सुधीर बोरपल्ले, मपोशि नालंदा पाटील आदीने यशस्विरित्या पार पाडली.
Source link