नागपूर : नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून विविध केंद्रामधून मोफत करण्यात येत आहे. लसीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा इतर कोणत्याही खाजगी संस्थांनी निधी गोळा करु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
नागपूर विभागात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 45 वर्षावरील नागरिकांना तसेच कोविन ॲपवरील नोंदणी केल्यानंतर 18 वर्षावरील नागरिकांना नि:शुल्क लस देण्यात येत आहे. यासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या केंद्रावर कुठेही शुल्क आकारण्यात येत नाही. लसीकरणासाठी कोणीही निधी गोळा करु नये, असे आवाहन यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
कोरोनाबाधित तसेच इतर रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध नोंदणीकृत संस्था, सामाजिक संस्था, खाजगी तसेच नोंदणीकृती आस्थापनाकडून आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. अशा कामासाठी गोळा केलेला निधी खर्च करता येऊ शकतो. परंतु लसीकरणासाठी अथवा लस खरेदीसाठी निधी गोळा करु नये. यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे लस उपलब्ध करुन देण्यात असल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.
Source link