कोरोनावर विजय प्राप्त करण्याचा संकल्प नववर्षात करु या : महापौर


नागपूर : मंगळवारी (१३ एप्रिल) रोजी मराठी नववर्षाचा प्रारंभ होत आहे. कोरोनाचे सावट मराठी नववर्षावर आहे. या वर्षी कोरोनावर विजय प्राप्त करण्याचा संकल्प नववर्षात करु या, असे आवाहन महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

मराठी नववर्ष गुढीपाडवा व चैत्र नवरात्र आणि सिंधी बांधवांचे चेटीचंट सणा निमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा देतांना महापौर श्री. तिवारी म्हणाले की, गुढीपाडव्याचा सण घरात उपलब्ध साहित्यामध्ये साजरा करा, घराबाहेर पडू नका, नागपूरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता घरातच राहून या साखळीला तोडण्यास मदत करा.

नागरिकांनी कोरोनावर विजय प्राप्त करण्यासाठी मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुण्याची सवय लावा आणि सामाजिक अंतराचे पालन करा. याच्यातूनच कोरोनावर नियंत्रण प्राप्त करु शकतो तसेच नागरिकांनी लसीकरणासाठी सुध्दा समोर यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
Source link

Leave a Reply