कार्यालय नियमित वेळेत
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी नोंदणी महानिरीक्षकांनी केले आवाहन
नागपूर : राज्यात वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता दस्तनोंदणीसाठी ऑनलाईन सेवांचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी केले आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी दस्तनोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी न करता ऑनलाईन सेवांचा अंगीकार करण्याचा नागरीकांनी प्रयत्न करावा .त्या अनुषंगाने राज्याच्या दस्तनोंदणीसाठी काही सूचना जाहिर करण्यात आल्या आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरूस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरिकांनी या विभागाच्या वेबसाईटवर असलेल्या दस्तनोंदणी करीता पीडीईव्दारे डाटा एंट्री करणे अनिवार्य आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील सोईची वेळ ऑनलाईन बुक करून कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करावी .
जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल.ऑनलाईन वेळ आगाऊ बुक नसल्यास दस्तनोंदणी होणार नाही. विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह अड लायसन ई -रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध् असल्याने लिव्ह ॲड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी पुढील आदेशापर्यत थांबविण्यात आली आहे. मुंबई ,ठाणे, पुणे या मोठ्या शहरात व इतर ठिकाणी सकाळ, दुपार दोन सत्रात कार्यालये सुरू होते. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमीत सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहतील.याशिवाय दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरू होते.
त्यांचे कामकाज शनिवार रविवारी बंद करण्यात येत आहे. आता फक्त सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमीत कामकाज सुरू राहील. नागपूर जिल्हयातही कोरोनाचा संसर्ग वाढता ऑनलाईन सेवांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर शहर आर.बी मुळे यांनी केले आहे.
Source link