क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त धंतोली झोन तर्फे अभिवादन - Expert News

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त धंतोली झोन तर्फे अभिवादन


नागपूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त मनपाच्या धंतोली झोन तर्फे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत, प्रमुख अतिथी म्हणून धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, डॉ. मेघा जैतवार, डॉ. स्वाती गुप्ता आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित महिलांना गुलाबाचे फुल आणि भेटवस्तू देण्यात आले.

कार्यक्रमाला झोनमधिल सर्व महिला कर्मचारी, न्यु बाबुलखेडा व कॉटन मार्केट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, नर्स आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन कल्पना देवगडे यांनी केले.

प्रमोद तभाने यांच्या हस्ते आर एल एलेवन क्रिकेट अकॅडमीचे उद्धाटन

कुकडे ले-आउट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांच्या हस्ते आर एल एलेवन क्रिकेट अकॅडमीचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत, अकॅडमीचे प्रमुख ‌ऋशी लोधी, झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, वंदना हिरेखान, श्री. वैद्य, श्री. नरांजे तसेच खेळाडू उपस्थित होते.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: