खाजगी पॅथॉलॉजी लॅब मधील कोव्हीड चाचणी रिपोर्ट मध्ये घोळ


नागपुर – मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे १० एप्रिल २०२१ रोजी श्रीमती सुशीला भाऊराव गाडगे, प्लॉट नंबर १२, धरमपेठ सायन्स कॉलेज च्या मागे अंबाझरी लेआऊट ह्यांनी आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्यासाठी आपले नमुना (Sample) तपासणीसाठी दिले. त्याची फी रु. ३७००/- “गुगल पे” ह्या शोधन ऍप च्या माध्यमातून केले.

परंतु चार दिवसानंतर आज त्यांना त्यांचा रिपोर्ट देण्यात आला तो संपुर्ण चुकीचा. रिपोर्ट मध्ये नमुना देण्याची तारीख १४ एप्रिल २०२१, त्यांचे वय तसेच त्यांचा आधार क्रमांक पुर्णतः चुकीचा नमूद केलेला आहे. ह्या वरून असे लक्षात येत आहे की हा तपासणी अहवाल सुशीला गाडगे ह्यांचा नसून आणखी कुणाचा तरी त्यांना देण्यात आला. कोरोना महामारीचा उद्रेक आणि रुग्णांची संख्या लक्षात घेता तसेच कामाची व्याप्ती बघता अहवालाची नीट तपासणी न करता कुणाचा तपासणी अहवाल कुण्या दुसऱ्याला देण्याच्या ह्या हलगर्जीपणा अमाप पैसा (लूटमार) कमावण्यासाठी कुणाच्या जीवावर आरिष्ट ओढावू शकतो ह्याचे भान सुद्धा ह्यांना राहिलेले नाहीं. तपासणी अहवाला मध्ये इतक्या अक्षम्य चुका करून ठेवल्या आहेत की त्यांचा कोव्हीड नमुना अहवाल हा सुद्धा बरोबर आहे की नाही ह्यात शंका निर्माण झालेली आहें.

 

श्रीमती गाडगे ह्यांच्या कोरोना अहवाल आज चार दिवसांनी चूक किंवा बरोबर आहे ह्यात शंका असल्यामुळे त्याचे तीन ते चार दिवस निघून गेले आहेत आणि अश्या अवस्थेत त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले किंवा प्रकृती ढासळली तर ह्याला जबाबदार कोण ? ह्याचे उत्तर मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ह्यांना द्यावे लागेल. ज्या कुणी कर्मचाऱ्यांनी हा अहवाल तयार केलेला आहे व ज्यांची स्वाक्षरी प्राधिकरण म्हणून स्वाक्षरीने अहवाल देण्यात आलेला आहे त्या डॉ. स्वेता कावलकर ह्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून असा प्रसंग पुन्हा कुणावर ओढावणार नाही तशी दक्षता घेण्यात यावी.




Source link

Leave a Reply