गुरुवारी १८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २२ एप्रिल) रोजी १८ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,२८,००० चा दंड वसूल केला.

पथकाने अर्जुन मेडिकल स्टोर्स, मनीष नगर ला रु ५००० दत्त मेडिकल स्टोर्स मनीष नगर ला रु ५००० व पुरुषोत्तम मार्केटला रु ८००० चा दंड कर्मचा-यांची RTPCR चाचणी न केल्याबददल केला. पथकाने ७६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.




Source link

Leave a Reply Cancel reply