गृहविलगीकरणाचे पालन न केल्यामुळे रुग्णांची पाचपावली विलगीकरण केन्द्रात रवानगी


नागपूर: सतरंजीपुरा झोन द्वारे मागील १ महिन्या पासून कोरोना विषाणू पासून बाधित झालेले रुग्ण आप आपल्या घरी विलगीकरण मध्ये आहेत किंवा नाही या बाबत एकूण ३ भरारी पथकांद्वारे दररोज आकस्मिक पडताळणी करण्यात येत आहे .

आज दिनांक १६/०४/२०२१ रोजी रुग्ण श्री प्रियेश गजभिये राहणार : पंचवटी नगर बिनाकी हे घरी होम आयसोलेशन मध्ये आहेत किंवा नाही या बाबत सदर रुग्णाच्या राहते घरी भेट देऊन आकस्मिक पडताळणी करण्यात आली . या वेळी सदर रुग्ण श्री प्रियेश गजभिये हे घरी उपस्थित नव्हते .

त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांनी या रुग्णाला फोन करून घरी बोलविले . सदर रुग्ण श्री प्रियेश गजभिये यांनी कोरोना च्या विलगीकरण नियमांचे तंतोतंत पालन न केल्यामुळे सतरंजीपूरा झोन क्र ०७ चे सहायक आयुक्त श्री विजय हुमने व सहायक अधीक्षक श्री श्याम कापसे यांच्या निर्देशान्वये या रुग्णाला पांचपावली विलगीकरण केंद्रामध्ये हलविण्यात आले .

येथे या रुग्णाचे संपूर्ण उपचार करण्यात येईल .या कार्यवाही मध्ये भरारी पथक प्रमुख श्री राकेश सहारे व श्री विजय रामटेके श्री संजय मलिक श्री सचिन मेश्राम श्री तांबे श्री पानतावणे उपस्थित होते .




Source link

Leave a Reply