जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिबंधित क्षेत्राला भेट


नागरीकांना आवाहन

भंडारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्राला जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. जास्त व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी साई मंदिर परिसर, पिंडकेपार गणेशपूर, गणेशपूर बाजार, केसलवाडा व मौजा दाभा आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांनी घरा बाहेर फिरू नये असे आवाहन त्यांनी केले.

आपल्यामुळे इतर कोणी व्यक्ती संक्रमित होणार नाही याची जबाबदारी आपलीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार अक्षय पोयाम, गट विकास अधिकारी नूतन सावंत, मुख्याधिकारी विनोद जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Source link

Leave a Reply