नागपूर: शहर व ग्रामीण भागातील लॉकडाऊनची मर्यादा आता वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना येथे शनिवारी दुपारी केली.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर पसरत असण्याच्या काळात हा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी, शहरात व ग्रामीण भागात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या काळात अर्थचक्र रोखले जाणार नाही याची काळजी घेऊ असेही सांगितले.
फळे, भाजीपाला, धान्य दुकाने 4 वाजता पर्यंत सुरू राहतील, ऑनलाईन रेस्टरंट 7 वाजता पर्यंत सुरू राहतील असेही सांगितले.
Source link