नागरिकांच्या सतर्कतेसाठी पोलीस करताहेत जीवाचे रान


– साई मंदिर पुलिया मार्गावर नवीन कामठी पोलिसांची 24 तास नाकाबंदी सुरू,नागरिकांना सहकार्य करण्याचे आव्हान

कामठी :-वाढत्या कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी एसीपी रोशन पंडित, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, दुययम पोलीस निरीक्षक काळे, पोलिस निरीक्षक विजय मालचे, एपीआय सुरेश कर्नाक्के, पोलीस उपनिरीक्षक वारंगे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उन्हातान्हात भर रोडावर उभे राहून जीवाचे रान करताना दिसतात मात्र टवाळखोर व रिकांमटेकड्यांच्या लक्षात येत नसल्याने दंडाची वसुली करूनही नागरिक भरधाव वेगाने वाहने चालवीत विनाकारण घराबाहेर पडत आहेत.

कामठी तालुक्यात कोरोना पॉजिटिव्ह चा आकडा हजारोंच्या संख्येने वाढत असून मृत्युदर सुदधा तेवढ्याच झपाट्याने वाढत आहे.यासाठी सुरक्षात्मक दृष्टिकोनातून कळमना टी पॉईंट चौक, हॉकी बिल्डिंग चौक, रणाळा रोड सह साई मंदिर पुलिया जवळ 24 तास नाकाबंदी लावून बॅरिकेट लावून बिनकामाणे फिरणाऱ्या वाहनचालकांना थांबवून वाहनाच्या कागदपत्रांच्या चौकशी करतात .वाहनांची कागदपत्रे व बाहेर फिरण्याचे ठोस कारण तपासून दंड आकारतात त्यालाही युवावर्ग जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.पोलीस कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, महसूल विभाग रस्त्यावर भर उन्हात उभे राहून जनतेचे रक्षण करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.

वारंवार समज देत आहेत.तेव्हा आपलेही कर्तव्य समजून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला पाहिजे यासाठीच प्रशास्सन वेगवेगळे फंडे वापरून कोरोनावर मात करण्यासाठी धडपडत आहेत याचीच नागरिकांनी जाण ठेवायला पाहिजे .तेव्हा घरीच सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करावा अशी विनंती वजा आव्हान एसीपी रोशन पंडित, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे यांनी केले आहे.




Source link

Leave a Reply