नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अथक प्रयत्नांमुळे विशाखापट्टणमच्या आर आय एन एल प्लांटमधून महाराष्ट्राला दररोज 97 मे टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यापूर्वी भिलाई येथून 60 मे टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा येथे होत आहे, हे येथे उल्लेखनीय.
आता दररोज 157 मे टन ऑक्सिजन मिळणार आहे. आगामी दोन दिवसात विशाखापट्टणम येथून पुरवठा सुरू झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा येथील कोविड रुग्णांना दिलासा मिळेल. रुग्णांचा जीव वाचणार आहे.
ना. गडकरी यांनी रुग्णालयाना आवाहन केले आहे की, आगामी काळात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता 50 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयांनी वातावरणातील हवेपासून ऑक्सिजन बनविण्याचे प्लांट लावावेत.
Posted by Nitin Gadkari on Wednesday, 21 April 2021
Source link