प्रभाग १३ येथे मोफत कोरोना चाचणी शिबिर- डॉ परिणीता फुके यांच्या प्रयत्नाने


कोरोना संसर्ग रोगावर मात करण्यासाठी प्रभाग क्र.१३ येथील विविध ठिकाणी मा.महापौर श्री. दयाशंकरजी तिवारी यांच्या निर्देशानुसार नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांच्या प्रयत्नने दि.०६ मे रोजी प्रभागातील पांढ़राबोडी,अंबाझरी, पंकज नगर, कमला नगर व हज़ारीपहाड़ परिसरात मोफत RTPCR चाचणी करण्यात आली. या शिबिरामध्ये प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात RTPCR टेस्ट करून आपला सहभाग नोंदविला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, वार्ड अध्यक्ष,युवा मोर्चा,महामंत्री व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
Source link

Leave a Reply