फडवीसांनी केली रुग्णांची आस्थेने विचारपूस


m>रुग्णालयात साधला संवाद : रुग्णांचे मनोबल उंचावले

नागपूर : एकीकडे कोरोनाने त्रस्त झालेल्या रुग्णांची आणि नातेवाईकांची दमछाक होत असताना अचानक विरोधी पक्ष नेते यांनी रुग्णांशी आभासी प्रणालीद्वारे संवाद साधून रुग्ण आणि नासतेवाईकांना सुखद धक्का दिला. आस्था, प्रेम आणि काळजीने केलेल्या या संवादामुळे रुग्णांचे मनोबल उंचावण्यास मदत झाली.

कोरोनाने अवघ्या जिल्ह्याला विळख्यात घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यात जीव गमावणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय रुग्णालय असो वा खासगी रुग्णालय, या सर्व कोव्हिड केंद्रात उपचारार्थ दाखल कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची मानसिकता खचत आहे. कोरोना रुग्णांची प्रकृती सुदृढ व्हावी आणि त्यांचे मनोबल उंचवावे यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ परिणय फुके, आमदार श्री प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, यांनी रुग्णालयात जाऊन सी.सी.टीव्हीद्वारे रुग्णांची आस्थेने चौकशी करीत त्यांचे मनोबल वाढवत त्यांना मायेची ऊब दिली.

रूग्णांची आस्थेने चौकशी करीत असल्याचे चित्र बघून वातावरण भावुक झाले. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. तिथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत रुग्णाजवळ नातेवाईकही थांबण्यास धजावतात. अशा विपरीत परिस्थितीत विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस रुग्णांच्या भेटीला आल्याचे बघून घाबरलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला.


नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी, रुग्णालयाच्या सद्यस्थितीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली. निवेदनामध्ये रुग्णालयात परिचर, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, अशा विविध अडचणी लक्षात आणून तात्काळ यावर कार्यवाही होण्याबाबत विनंती केली.

यावेळी सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य सभापती संजय महाजन, नगरसेविका डॉ परिणिता फुके, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका उज्वला शर्मा, नगरसेविका वर्षाताई ठाकरे, सहआयुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.




Source link

Leave a Reply