भरतवाड्यात लसीकरण केंद्र सुरू करा


लकडगंज झोन सभापतींचे निर्देश : जागेची केली पाहणी

नागपूर : पूर्व नागपुरातील लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या भरतवाडा परिसरात लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश लकडगंज झोन सभापती मनिषा अतकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्रभाग ४ अंतर्गत येणाऱ्या भरतवाडा मनपा शाळेत लसीकरणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने शाळेची पाहणी करण्यात आली. या लसीकरण केंद्रामुळे भारत नगर, सुभान नगर, नेताजी नगर, शिक्षक कॉलनी, साई नगर, आभा कॉलोनी, गुलमोहर नगर, गौरी नगर, ओम नगर, तलमले ले-आऊट, दुर्गा नगर, लक्ष्मी नगर, विजय नगर, धरम नगर, भोलेश्वर नगर, शिवशंभु नगर या भागातील नागरिकांना लसीकरणासाठी अधिक दूर जावे लागणार नाही.

या दृष्टिकोनातून भरतवाडा मनपा शाळेत लसीकरण केंद्र सुरू कऱण्याचे प्रस्तावित असल्याचे सभापती मनिषा अतकरे यांनी सांगितले. यावेळी सहायक आयुक्त साधना पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. भैसारे, नायडू, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विवेक ठवकर, सूरज अरसपुरे, तुषार राऊत, सागर भिवगड़े, चंदु घारपेंडे, अनुज अरसपुरे आदी उपस्थित होते.

Source link

Leave a Reply