मंत्री अमित देशमुख ‘खाली हाथ आये, खाली हाथ लौट गये’ ‘आश्वासनो का पिटारा खोल गये’


नागपूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा नागपूर दौरा शहरातील जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा साबित झाला असून देशमुख हे खाली हाथ आले आणि खाली हाथ परत गेले. कॉंग्रेसच्या परंपरेनुसार आश्वासनाचा पितर या शहराला देऊन गेले. मंत्री महोदयांची कसलीही प्लानिंग नाही, कसलीही योजना नाही. निव्वळ भेट घेऊन बैठका घेऊन शहर कोरोनाच्या कठीण परिस्थितीतून जाता असताना नागरिक हलाकान असून गोर-गरीब जनता इकडे-तिकडे भटकत असल्यामुळे शासन स्तरावर साधी दखल सुद्धा घेण्यात येत नाही. खाजगी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सामान्य रुग्णांची व्यवस्था होत नसून आधी 50,000/- किंवा 1 लाख रुपये ठेवा तेव्हाच प्रवेश मिळतो, यावर शासनाचे दुर्लक्ष आहे.

रेमडेसेवीरची कमी
मंत्री महोदयांचे रेमडेसेवीरची कमी नाही, हे बयान हास्यास्पद वाटत असून शहरामध्ये रेमडेसेवीर इंजेक्शन बाबत हाहाकार माजलेला आहे. प्रत्येक डॉक्टर रेमडेसेवीर इंजेक्शन आणा असे सांगत असून कोणत्याही फार्मसीत हे इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांचेमार्फत फक्त कोविड हॉस्पिटललाच देण्यात येते, असे जिल्हाधिकारी सांगतात. हे इंजेक्शन कुठेच मिळत नसून पेशंट भटकत आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढतच आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख रेमडेसेवीरक्ष्हि कमी नाही म्हणतात, तर तिकडे आरोग्य मंत्री राजेश टोपे रेमडेसेवीरसाठी केंद्राकडे बोट दाखवितात. यावरून या मंत्र्यामध्येच सामंजस्य नसल्याचे लक्षात येते.

डॉक्टर, नर्सिंग स्टाफची भरती हे खोटे आश्वासन
मंत्री महोदयांनी कोविड-19 पासून या दिड वर्षामध्ये अंदाजे 10 वेळा डॉक्टर, नर्सिंग स्टाफची भरती करण्यासंदर्भात अनेकवेळा बैठका घेऊन जाहीर केले. मात्र आजपर्यंत एकही पदाची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे किती वजन ठाकरे सरकारवर आहे, हे स्पष्ट दिसून येते.शहराच्या सगळ्या शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये अनेक पाडे रिक्त असून या कोरोनाच्या महामारीत अधिकारी, डॉक्टर व नर्सिंग स्टाफची कमी असल्यामुळे यंत्रणा संपूर्णपणे विस्कटीत झालेली आहे. अनेक डॉक्टरांवर कामाचा बोझा वाढत असून नवीन भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री महोदयांच्या आजूबाजूला बसलेले आमदार हे तोंडावर बोट ठेवून बसले होते. यावर एकही शब्द ते बोलले नाही याचे आश्चर्य वाटते.

ऑक्सिजन निर्मितीचा प्रस्ताव पाठवा, ही निव्वळ धूळफेक
मंत्री महोदयांनी ऑक्सिजन निर्मितीचा प्रस्ताव पाठवा असे सांगणे हे देखील हास्यास्पद वाटते. दिड वर्षापासून कोरोनाचा वाढता प्रकोप त्यामुळे या शहरात ऑक्सिजनच्या प्रस्तावाची मागील दिड वर्षापासून का आठवण आली नाही. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात ऑक्सिजन प्लाट उभारण्यासाठी विशेष निधी देण्यात आला होता. यातून किती प्लांट राज्य सरकारने उभारले याचा खुलासा करावा. मात्र पुन्हा-पुन्हा प्रस्ताव पाठवा असे प्रशासनाला सांगणे, हे योग्य आहे काय? अनेक बैठकीत सांगितल्यानंतर देखील आजपर्यंत प्रस्ताव कां पाठविण्यात आलेला नाही. हा प्रस्ताव कधी जाणार? कधी शासन मान्यता देणार? यावर शंका होत असून तोवर पेशंट हतबल होणार कां?

एकंदरीत कॉंग्रेसच्या परंपरेनुसार मंत्री महोदय खाली हात आले व खाली हात गेले. आश्वासनाचा पिटारा देऊन लातूरकडे रवाना झाले व उपस्थित कॉंग्रेसवाल्यांनी नेहमीप्रमाणे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

उक्त प्रतिक्रिया पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.
Source link

Leave a Reply