मनपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपा मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून नागपूर नगरीच्या वतीने अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, प्रभारी उपायुक्त महेश धामेचा, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती दीपक चौधरी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके उपस्थित होते. यानंतर महापौर दयाशंकर तिवारी यांनी संविधान चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केले.
Source link

Leave a Reply