कामठी :-मागील एक वर्षांपासून आपण सर्व कोरोना विषाणूला लढा देत आहोत यावर भारताने आधी लस काढून नागरिकांना सुधारण्याचे मौल्यवान कार्य हाती घेतले आहे.यालाच आपण समोर घेऊन जाण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता सकारात्मक भावनेतून लस टोचून घ्यावी व आपले जीवन उज्वल करावे असे प्रतिपादन जी प चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज गुमथळा व भुगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण कार्यक्रमाला दिलेल्या भेटीत व्यक्त केले.
याप्रसंगी कामठी पंचयात समितीचे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, गुमथळा व भुगाव ग्रा चे सरपंच, उपसरपंच , ग्रा प सदस्य तसेच सचिव , वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कोरोना लस टोचून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून कोरोनाच्या लस संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले.यावेळी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे अजूनही कोरोनाचा प्रकोप संपलेला नाही , कोरोनाचा चढता उतरता क्रम सुरूच आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अधिकाधिक नागरिक लसीकरण घेत आहेत , वय 45 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिकांचा कल लसीकरणा कडे वाढत आहे ही उत्तम गोष्ट आहे यावर समाधान सुदधा व्यक्त केले.
संदीप कांबळे,कामठी
Source link