कामठी :- शासनाने मराठा समाजाला दिलेले एस. ई. बी. सी.वर्गातील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याबाबत मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण देत नाही तो पर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नाही असा ईशारा कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
मराठा समाजाला एस ई बी सी चे आरक्षण विधानसभेत सर्व पक्षीयांच्या मदतीने मंजूर करून दिले होते.मात्र . आरक्षणानंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्यात आल्याचा निकाल दिला तसेच मराठा आरक्षण देत असताना 50 टक्केची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नाही असे स्पष्ट केले.आरक्षणावरती सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा दुर्दैवी आहे.समाज म्हणून उच्च शिक्षणाची, नोकरीची आस धरून बसलेल्या मराठा तरुणावर या निकालाने आभाळ कोसळले आहे.आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या मराठा तरुणाला न्यायालयाने सुद्धा न्याय दिला नाही याची मोठी खंत आहे.
मराठा समाजाला हक्काचे, न्यायिक आरक्षण जो पर्यंत मिळणार नाही तो पर्यंत हा आरक्षणाचा लढा सुरूच राहील.आणि जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार तो पर्यंत हा मराठा समाज स्वस्थ बसणार नाही असे मत काशीनाथ प्रधान यांनी व्यक्त केले आहे.
Source link