महापौर दयाशंकर तिवारी कोरोना पॉझिटिव्ह


लस घेण्याचे आणि कोरोना नियमावली पाळण्याचे केले आवाहन

नागपूर: नागपूर नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी यांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी (ता.१) पॉझिटिव्ह आला. मागील काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच कोव्हिड प्रतिबंधात्मक लस घेतली होती. ते पॉझिटिव्ह आले असले तरी कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लस हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. लस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह येत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. लसीकरणाचा फायदा ८२ टक्के लोकांना होतो. १८ टक्के लोक लसीकरणानंतर पॉझिटिव्ह येऊ शकतात. लस हे कोरोनाविरुद्धचे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना लस घ्यावीच, असेही ते म्हणाले.

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्ह आहे, असे गृहीत धरून नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे. मास्क, सॅनिटाईझर आणि सोशल डिस्टंन्सिंग या बाबी पाळायलाच हव्या. गर्दी करू नये अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Source link

Leave a Reply