महापौर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस - Expert News

महापौर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस


मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन

नागपूर : महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी 13 मार्च रोजी संध्याकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली.

याचवेळी त्यांची 99 वर्षांची आई सरस्वती देवी, त्यांचे लहान बंधू क्षमाशंकर व त्यांची पत्नी नी सुद्धा लस घेतली. मेडिकल कॉलेज मधे 99 वर्षाची लस घेणारी सरस्वती देवी प्रथम आहेत. या वेळी मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ अविनाश गावंडे व मनपा चे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ विजय जोशी उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलताना महापौर म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा कोव्हाक्सिन लस होती हे त्यांनी आवर्जून सांगितले.

नागपुरात 4 लाख लस आली आहेत आणि जे पात्र आहेत असे प्रत्येकानी लस घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. महापौर म्हणाले लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

%d bloggers like this: