मिसिंग तक्रारसाठी एफिडवेट आवश्यक नव्हतेच….


आरटीआईमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयचा खुलासा

खापरखेड़ा :- काही वस्तु , साहित्य ,मोबाइल किंवा दस्तावेज हरविल्यास पीड़ित नागरिकांकडून एफिडवेट आणण्यासाठी राज्यातील अनेक पोलिस स्टेशनमध्ये सक्ती केल्या जात होती. आता अश्यातच कोणत्याही मिसिंग विषयी तक्रार दाखल करताना कधीही एफिडवेट किंवा शपथपत्र आवश्यक नव्हतेच आणि आताही आवश्यक नाहीच, अशे कोणतेही आदेश, नियम व परिपत्रक वगेरे नाहीच , असा धक्कादायक खुलासा नागपुर पोलिस अधीक्षक कार्यालयद्वारे मांहिती अधिकार अर्ज़ात प्राप्त मांहितीममध्ये करण्यात आला आहे.

एखाद्या व्यक्तिचे मोबाइल, सिम, आधार कार्ड, एटियम, पासबुक किंवा अन्य आवश्यक दस्तावेज हरविल्यास त्याचा इतर व्यक्तिद्वारे ग़ैरवापर होवू नये आणि त्यांची दुय्यम प्रत मिळण्यासाठी कार्यालय किंवा मोबाइल कंपनीद्वारे पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार नोंद करणे आणि त्याची एनसी किंवा ओसीची प्रत सोबत जोड़ने बंधनकारक केले आहे , तेंव्हाच त्याची दुय्यम प्रत ग्राहक किंवा पीड़ितला दिली जाते . अश्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये वस्तुच्या मिसिंगची तक्रार दाखल करण्यास आलेल्या पीड़ित व्यक्तीला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे एफिडवेटच्या नावावर वेठीस धरण्याचे प्रकार समोर येत आहेत. मिसिंग विषयी एफिडवेट न आनल्यास पीडित व्यक्तिची तक्रार न नोंदवता पोलिस स्टेशनमधुन परत पाठवित असल्याचे प्रकार सुद्धा आले आहेत. काही पीड़ित नागरिकांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार काही पोलिस स्टेशनमध्ये तर एफिडवेट शिवाय तक्रार घेतल्या जाणार नाही , याविषयीचे फलक/पोस्टरच लावून ठेवले आहेत, हे विशेष. त्या पोस्टरवर त्यासंबंधी शासनाने पारित केलेले आदेश, नियम, कायदा किंवा परिपत्रकचा कोणताही संदर्भ नमूद नसतोच .

अशे कोणतेही आदेश नाहीच…
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी नागपूरचे पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस आयुक्त कार्यालय यांना माहितीचा अधिकार अर्ज दाखल करून अश्या प्रकारचे मिसिंग तक्रार दाखल करतेवेळी एफिडवेट किंवा शपथपत्र आवश्यक असणेविषयी मागील आदेश व आता आवश्यक नसणे विषयी शासनाचे परिपत्रक, आदेश, नियम व कायदे विषयी माहिती मागितली होती. त्या अर्जावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक कार्यालयचे जनमाहिती अधिकारी असलेले पोलिस उपाधीक्षक (गृह) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशनमध्ये एखादी वस्तु , दस्तावेज, मोबाइल हरवले विषयी मिसिंग तक्रार दाखल करतेवेळी त्यासोबत एफिडवेट किंवा शपथपत्र देने बंधनकारक नाही , अश्या प्रकारचे आदेश नसल्याने आदेशांची प्रत कार्यालयात उपलब्ध नाही , अशी स्पष्ट माहिती देण्यात आली आहे .

पीडितांनी वरिष्ठांना तक्रार करावी
एखादी वस्तू दस्तावेज मोबाईल हरवले विषयी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल करतेवेळी कोणतेही पद किंवा शपथपत्र सादर करणे विषयी कोणतेही आदेश नियम परिपत्रक नसूनही नाही अशावेळी जर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून अपडेट किंवा शपथपत्र साठी सक्ती केली जात असेल तर त्यांची तक्रार थेट सरळ पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये करावी असे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे





Source link

Leave a Reply