कामठी :-रमजान ईद हा पर्व घरातच साजरा करावा तर पुढील वर्षाचा रमजान सण साजरा करण्यासाठी स्वतःला वाचवा यासाठी प्रशासनाने मार्गदर्शीत केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा तसेच प्रशासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शीत सूचनेनुसार रमजान ईद च्या दिवशी मस्जिद मध्ये पाच च्या वर अनुयायानी नामाज पठन करू नये तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे मार्गदर्शन डीसिपी निलोत्पल यांनी केले.
रमजान सना निमित्त नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे मुस्लिम बांधवांच्या मुख्य उपस्थितीत पोलिस विभागाच्या वतीने आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते .या बैठकीत एसिपी रोशन पंडित, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, एपीआय सुरेश कर्नाके आदी …उपस्थित होते.
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव असल्याने सणांना साजरा करण्यासाठी प्रशासनातर्फे सक्त मनाई करण्यात आली असून सण घरीच साजरे करा असे आव्हान करण्यात आले.सण साजरा करताना सोशल डीस्तानशिंग चे पालन करा, मास्क वापरा, वारंवार हात धुवा , आजारी रुग्णांना मदत करा.असे सांगण्यात आले.
सभेचे संचालन गुप्त विभागाचे मयूर बन्सोड तर आभार शाहिद शेख यांनी मानले
Source link