कामठी : स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करीत असता सहपाठी तरुणीशी झालेली ओळख ही प्रेम प्रकरणात झाले व लग्नाचे आमिष देऊन प्रियकराने प्रियेसी सह वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच स्वतःच्या वाढदिवसाचे निमित्त साधून प्रियसी ला शेगाव ला नेऊन प्रियेशी च्या इच्छे विरुद्ध जबरी संभोग केल्याची घटना 2019 मध्ये घडली त्यानंतर प्रियेसी ला लग्न करण्याचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करीत राहिला मात्र लग्न करण्याची मागणी प्रियेशी ने केला असता प्रियकराने ही मागणी फेटाळून लावत तिचा विश्वास घात करून दुसऱ्या मुलीशी लग्न ठरविले असून सदर तरुणाचे एप्रिल महिन्यात लग्न सुदधा होणार आहे यासंदर्भात कामठी येथील राहुल बुद्ध विहार जवळ राहणारी 28 वर्षीय तरुणी फिर्यादी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धर्मदास गेडाम रा शिवण पायली ता चिमूर जिल्हा चंद्रपूर विरुद्ध भादवी कलम 376, 420 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी व फिर्यादी तरुणो हे स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये नागपूर च्या भाऊसाहेब कोलते वाचनालयात दररोज जात असत दरम्यान या दोघांचे मैत्री संबंध मोबाईल वर बोलता बोलता प्रेमसंबंधात बदलले .दरम्यान आरोपी चा 2 सप्टेंबर ला वाढदिवस असल्याने सदर फिर्यादी तरुणीला 4 सप्टेंबर ला शेगाव ला चालण्याचे निमंत्रित केले मात्र तरुणीने या निमंत्रणाला विरोध केल्याने तू माझ्याशी प्रेम करीत नाही असे सिद्ध होत असल्याचे सांगत नाराजगीचा सूर वाहला यावर तरुणी ने ही नाराजगी दूर करण्यासाठी शेगाव ला जाण्यास होकार दिला यावरून 4 सप्टेंबर 2019 ला शेगाव ला गेले असता आरोपी व फिर्यादी हे दोघेही शेगाव च्या हॉटेल ग्रॅण्डसन ईथे थांबले यावेळी आरोपीने फिरयादीच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केला व लग्न करण्याचा विश्वास संपादन करून नागपूर च्या बाहेर ठिकठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले बरेच दिवस हा संभोगीय प्रकार सुरू असल्याने सदर फिर्यादीने लग्न करण्याची मागणी केली असता आरोपी कडून या मागणीला टाळाटाळ सुरू होतो शेवटी माझे लग्न दुसरीकडे जुळले असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही असे सांगितले असता सदर फिर्यादी तरुणीला एकच धक्का बसला यानंतर आरोपी तरुणाने एका मुलींशी साक्षगंध जुळले असल्याची माहिती तरुणीला मिळताच फिर्यादी तरुणीने वास्तविक सत्यता सांगून नाते तोडले मात्र आता 4 एप्रिल 2021 ला वर्धा येथील एका तरुणीशी आरोपी चे लग्न जुळल्याची माहिती मिळाली असता सदर पीडित तरुणी फिर्यादी ने न्यायिक मागणीसाठी आता नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून आरोपी तरुनविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखलं केला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे.तरपुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी



















Source link