वाडीत शार्ट सर्कीट ने कुरिअर पार्सल व्यवसायाचे दुकान जळून खाक ! - Expert News

वाडीत शार्ट सर्कीट ने कुरिअर पार्सल व्यवसायाचे दुकान जळून खाक !


वाडी : वाडी स्थित काटोल वळणावर असलेल्या अविनाश कार्गो प्रा.लि.येथे सकाळी १० च्या सुमारास आग लागल्याने आतील कुरियर साहित्य जळून खाक झाल्याने व्यवसायिकात एकच खळबळ उडाली व आजूबाजूचे व्यवसायिक वेळेवर मदतीला दुकानात पोहोचल्याने मोठी हानी टळली.

प्राप्त माहितीनुसार उमेश बुदेला रा.रहाटे कॉलनी, नागपूर यांची काटोल वळणावर स्वतःची व्यवसायिक इमारत आहे.त्यांनी या इमारतीतील एक भाग अविनाश कार्गो प्रा.लि.चे मालक बबन शेळके रा.सातारा यांना कुरियर एजन्सी चालविण्यासाठी भाड्याने दिली.या कक्षात औषधी,पेपर,आद्योगिक साहित्य,अभियांत्रिकी साहित्य,पावडर,बॅग इ.मोठ्या प्रमाणात कुरियर चे साहित्य होते.आज सकाळी साडेदहा च्या सुमारास अचानक दुकानात आग लागली व आगीचा धूर दुकाना बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दुकान मालकांना याची फोनवरून सूचना दिली. परंतु तोपर्यंत पाहता-पाहता संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.

याची सूचना वाडी नगरपरिषद अग्निशमन दलाला मिळताच स्वच्छता पर्यवेक्षक रमेश कोकाटे सह अग्निशमन दलाचे अनुराग पाटील,कार्तिक शहाणे,आनंद शेंडे,नितेश वघारे,वैभव कोळसकर इत्यादींनी बंब द्वारे जळालेल्या साहित्यावर पाण्याचा मारा केला व आगीला काबूत आणले कुरियर एजन्सीचे पर्यवेक्षक राहुल मोहोड यांच्या मतानुसार तो पर्यंत करोडो रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले होते.वाडी पोलीस व वाडी-एमआयडीसी वाहतूक विभागाला याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व स्थितीला नियंत्रित केले. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: