कामठी :-एप्रिल महिन्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात ब्रेक द चैन च्या नावखाली संचारबंदी सह जमावबंदी लागू करण्यात आली आहे ज्यामुळे विवाह समारंभ रद्द झाले आहेत.
यामुळे या सोहळया वर आधारित रोजगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अनेक छायाचित्रकार (फोटोग्राफर)आर्थिक अडचणीत सापडले आहेत याचा मोठा फटका फोटोग्राफी करणाऱ्याना बसला असून यामुळे अनेक छायाचित्रकारांचे कंबरडे मोडले आहेत त्याच्यासमोर दररोजच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शासनाने यासंदर्भात विचार करून छायाचित्रकारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी समाजसेवक सतीश घारड यांनी केले आहे.
Source link