शिधापत्रिका पडताळणीत हमीपत्रावरील माहितीवरून संभ्रम - Expert News

शिधापत्रिका पडताळणीत हमीपत्रावरील माहितीवरून संभ्रम


गॅस जोडणीबाबत चुकीची माहिती दिल्यास शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता


कामठी :-शासनाच्या वतीने अपात्र शिधापत्रिका अनुषंगाने शोध मोहीम राबविण्यात येत आहे.त्यामध्ये ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही त्यांना हमीपत्र भरून द्यावयाचे आहे,पण या हमीपत्रामुळे गॅस जोडणी असलेल्यामध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.गॅस जोडणी नसलेल्यानी हे हमीपत्र द्यावयाचे असुन गॅस जोडणी असतानाही गॅस जोडणी नसल्याचे माहिती दिल्याचे उघडकीस आल्यास मात्र शिधापत्रिका रद्दची कारवाहो होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे माहिती लपविणे शिधापत्रिका रद्द होण्याचे कारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरासह ग्रामीण भागातही बहुतांश नागरिकांकडे शिधापत्रिका आहेत.गॅस कनेक्शनही बहुतांश जणांकडे उपलब्ध आहेत.शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकावर त्याचे शिक्कादेखील मारण्यात आले आहे.शिधापत्रिका धारकाला एक अर्ज भरून तो स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यायचा आहे या अर्जामध्ये कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती विचारली आहे.घरगुती गॅस जोडणीसंदर्भातही माहिती विचारली आहे त्यामध्ये गॅस जोडनिधारकांचे नाव , ग्राहक क्रमांक, सिलेंडरची संख्या, गॅस कंपनीचा समावेश आहे.

या सोबतच एक हमीपत्रही दिले असुन त्यात मी अर्जदार शपथेवर सांगतो की माझ्या नावे तसेच कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांचे नावे गॅस जोडणी केलेली नाही.तेव्हा गॅस जोडणी शिधापत्रिका धारकांना सदर मोहिमेतील पडताळणी नंतर रेशन धान्य लाभ देण्यात येणार की नाही?या संभ्रमात शिधापत्रिका धारक गुंतलेले आहेत

संदीप कांबळे कामठी




Source link

Leave a Reply

%d bloggers like this: