नागपूर/ मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (CBI raid on Anil Deshmukh) यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले. सीबीआयचे अधिकारी PPE किट घालून ही छापेमारी केली.
दरम्यान जवळपास दहा तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी, अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून बाहेर पडले. यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या.
Source link