स्पाइस हेल्थ च्या मोबाइल चाचणी लॅब चे आज लोकार्पण


नागपूर : नागपूर महानगरपालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभागाला स्पाइस जेट हेल्थ कंपनी कडून आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्यासाठी मोबाइल चाचणी लेबारेटरी गुरुवारी (२९ एप्रिल) ला दुपारी १२ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे प्रदान करण्यात येईल. या छोटेखानी कार्यक्रमात केन्द्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री श्री.नितीन राऊत, विधानसभेत विरोधी पक्ष नेता श्री. देवेन्द्र फडणवीस, महापौर श्री. दयाशंकर तिवारी, राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री.गिरीश व्यास, नागो गाणार, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, स्पाइस ग्रुपचे चेयरमेन आणि एम.डी.श्री. अजय सिंह, स्पाइस हेल्थ च्या सी.ई.ओ. अवनी सिंह, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, वैद्यकीय आरोग्य व सेवा समिती सभापती श्री. महेश महाजन, नगरसेवक डॉ. रविन्द्र भोयर, श्री. सतीश होले, नगरसेविका श्रीमती उषा पॅलट व श्रीमती शीतल कामडे आदी उपस्थित राहतील.




Source link

Leave a Reply