कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लकडगंज रहीवासी एका गुंडपृवृत्तीच्या व्यक्तीने अवैध गोवंश जनावरांची वाहतूक करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सवयाधीन राहून परिसरात प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण केले होते तसेच याविरुद्ध नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे विविध प्रकारचे चोरी, दुखापतीचे गुन्हे दाखल असून नागपूर शहराच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासह परिसरात शांतता राखण्यासाठी व सदर गुन्हेगाराच्या गुन्हेवृत्तीस आळा बसावा यासाठी परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त यांनी 26 ऑगस्ट 2019 ला सदर आरोपीस दोन वर्षासाठी नागपूर शहर व नागपूर ग्रामिन येथून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते मात्र सदर आरोपीने मुदत संपण्यापूर्वीच व कोणतेही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता विना परवानगी कामठी शहरात वावरताना मिळून आल्याने सदर इसमाला अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव फाजील अहमद वल्द फैय्याज अहमद वय 28 वर्षे रा लकडगंज कामठी असे आहे.
ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त निलोत्पल व एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पोलीस निरीक्षक काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कननाके, पोलीस शिपाई मंगेश लांजेवार,मंगेश यादव, राजेंद्र टाकलीकर, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता यांनी केली.
Source link