काशीनगर बाजारावरून नागरिकांचा महापौरांना घेराव

March 5, 2021 0 By Expert News
काशीनगर बाजारावरून नागरिकांचा महापौरांना घेराव


धंतोली झोन सभापती वंदना भगतवर स्थानिकांचा रोष

– तणावपूर्ण वातावरणात रहिवासीयांचे पुन्हा आंदोलन

नागपूर. शहरातील दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या रामेश्वरी, काशिनगर, द्वारकापुरी, सम्राट अशोक कॉलोनी, हावरापेठ मधील प्रभाग क्रमांक-33 च्या रहिवासीयांना गेल्या अनेक वर्षांपासून वस्तीतील रस्त्यावरच ठिय्या मांडून बसणाऱ्या अनाधिकृत सोमवार बाजाराची समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गत वर्षात कोरोना येण्यापूर्वी नागरिकांच्या विरोधानंतर उपरोक्त बाजार बंद पाडण्यात आले. यानंतर रामेश्वरी रोडवर बेकायदेशीररित्या हा बाजार सुरू आहे. तसेच खसरा क्रमांक 51/1, 51/2 मौजा बाबुळखेडा काशीनगरात नागपूर महानगर पालिकेचे चार ते पाच तुकडयांमध्ये मोकळे भूूखंड आहे. ही जागा मंजुरी विकास योजनेत व्हेजीटेबल मार्केट या आरक्षणा खालील आहे. या जागेत प्रशासनातर्फे भाजीपाला बाजारासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, तुकडयांमध्ये असलेल्या हा भूखंड कोणत्याही पद्धतीने बाजारासाठी योग्य नसल्याचे नागरिकांचे बोलणे आहे.

तसेच या भूखंडाचा वापर सध्या असामाजिक तत्वांकडून होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. या मोकळया पट्टयात जर दवाखाना, शाळा, गार्डन, क्रीडा संकुल (खेळाचे मैदान, बॅडमिंटन कोर्ट, स्वीमिंग पूल, जाॅगींग ट्रॅक आदी), वाचनालय, समाजभवन आदीवास्तूंसाठी करावी या मागणीसाठी परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून निवेदन करीत आहेत.

उपरोक्त आरक्षण रद्द करण्याबाबत प्रभाग क्रमांक-33 च्या नगरसेविका विशाखा शरद बांते (भाजप), नगरसेवक मनोज गावंडे (काॅंग्रेस), नगरसेविका भारती विकास बुंदे (भाजप) व सुश्री. वंदनाताई भगत (भाजप) चारही नागरसेवकांचे पत्र जोडून नागरिकांनी गत वर्षी सविस्तर निवेदन तत्कालीन महापौर संदीप जोशी यांना दिले होते. त्यावर महापौरांनी बाजार दुकानदारांना पर्यायी जागा देण्याचे कबूल केले.

मात्र, कोरोनाचा काळ आल्यानंतर उपरोक्त मागणीची पूर्तता झाली नाही.

..तर ते पत्र का दिले
अशातच नव्याने धंतोली झोनच्या सभापती स्थनिक नगरसेविका वंदना भगत झाल्यानंतर त्यांनी हा विषय उकलून काढला. त्यांनी बाजार उपरोक्त भूखंडात भरविण्याचा निश्चय केला.

तसेच महोपौरांना जागेची पाहणी करण्यास बोलवले. मात्र स्थानिकांना बाजार हवे नसल्याने त्यांचा विरोध कायम होता. शुक्रवारी सकाळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी उपरोक्त जागेची पाहणी केली. याप्रसंगी सभापती वंदना भगत, नगरसेविका विशाखा बांते, नगरसेवक मनोज गावंडे, माजी नगरसेवक शरद बांते यांची उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी पाहणी केल्यानंतर दाट वस्तीत असलेल्या उपरोक्त जागेचा वापर बाजारासाठी करू नये हा विषय भूपेंद्र (गोलू) बोरकर, संजय वर्मा, डॉ. विक्रम कांबळे, डॉ. मधूकर मून,दिपाली कांबळे, सुरेश मुन, अमिय पाटील, भूषण भस्मे, शिरीष जंगले, रजनी पाटील, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, रवि रामटेके, अमित उपासक, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदिंनी लावून धरला. दरम्यान जर भगत यांना बाजाराचा विरोध नव्हता तर त्यांनी ते पत्र का तत्कालीन महापौरांना का दिले असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

आधी भूखंड नियीमत करा
नागरिकांच्या मते आरक्षीत जागेवर मोठया प्रमाणात रहिवाशी भूखंड असून 90 टक्के घरांचे वास्तव्य आहे. आणि सर्व भूखंड धारकांनी हजार रूपये भरून भूखंड नियीमत करण्याकरिता नागपूर सुधार प्रन्यासकडे गुंठेवारी अंतर्गत अर्ज सादर केलेले आहे. परंतु, या ठिकाणी व्हेजीटेबल मार्केटचे आरक्षण असल्यामुळे परिसरातील भूखंडाचे नियमीती करण झाले नाही. नुकतेच महाराष्ट्र शासनाने नासुप्र प्रन्यास ऐवजी नियोजन प्राधिकरण मनपा कार्यालयाकडे देण्यात असल्यामुळे सदर जागेवारी आरक्षण हटवून या लोक वस्तीला नियीमत करावे अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र, अशातच सभापती यांनी उपरोक्त जागेवर बाजार आणनार अशी भूमिका माडल्यानंतर स्थानिक रहिवासी संतप्त झाले. यापूर्वी बाजार हटविण्यासंदर्भात पत्र दिल्यानंतर पुन्हा बाजार बसविण्याची भूमीका भगत यांनी घेतल्याने नागरिकांचा रोष वाढला. विरळ वस्तीत पुन्हा बाजार बसले तर अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागेल असेही नागरिक यावेळी म्हणाले. यावेळी नारेबाजी करून काशीनगर रहिवासी कृती समितीच्या राहिवसीयांनी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

काही वेळातच मनपाचे बुलडोजर पोहचले
महापौर गेल्यानंतर काही वेळातच मनपाचे बुलडोजर मोकळ्या भूखंडाला समतल करण्यास पोहोचले. मात्र, स्थानिक महिलांनी बुलडोजर समोर येऊन मनपाचे काम होऊ दिले नाही. जेव्हा पर्यंत या बाजाराचा प्रश्न निकाली लागत नाही तो पर्यंत काम होऊ देणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली. यावेळी जोरदार नारेबाजी सुद्धा करण्यात आली.



Source link