प्लाझ्मा दान शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


भंडारा:- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जीवनदान ठरणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या शिबिराच्या उदघाटनाला खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ. हरीश वरभे उपस्थित होते. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आले असून ज्यांना कोरोना होऊन गेला अशा व्यक्ती आपला प्लाझ्मा दान करतात.

गेल्या वेळी आयोजित शिबिरात 96 व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून अनेक रुग्णांना संजीवनी प्रदान केली होती. हे शिबिर राज्यात सर्वात मोठे ठरले. या शिबिरात पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या बद्दल पालकमंत्र्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. कोरोना होऊन गेलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करावा असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात खासदार सुनील मेंढे, यांनी आपली अँटीबॉडी टेस्ट करून घेतली.




Source link

Leave a Reply