1 कोटी 21 लक्ष 30 हजार रुपयांचा अर्थसंकल्प अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर - Expert News

1 कोटी 21 लक्ष 30 हजार रुपयांचा अर्थसंकल्प अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर


– मुख्याधिकारी संदीप बोरकर व उपाध्यक्ष अहफाज अहमद यांची विशेष अनुपस्थिती

कामठी :- सन 2021-22या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक नगराध्यक्ष मो शहाजहा शफाअत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सर्वसाधारण सभेत लेखापाल अमित खंडेलवाल यांनी सादर केलेल्या सन 2021-2022च्या आर्थिक वर्षाचे 1 कोटी 21 लक्ष30 हजार रुपयाच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या सभेत 26 सदस्य उपस्थित होते मात्र नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर व उपाध्यक्ष अहंफाज अहमद हे प्रामुख्याने अनुपस्थित होते हे इथं विशेष!

अर्थसंकल्प सादर करताना महसुल कर आणि भरपाई, महसुली अनुदाने, नगर परिषद मालमत्तेपासूम पासून उत्पन्न, फी आकार व दंड, वैशिष्ट्य प्रयोजनासाठी अनुदाने, आस्थापना व खर्च, प्रशासकीय खर्च , मालमत्तेची दुरुस्ती व परीक्षण, राखीव निधी, व संकीर्ण, खर्च, भांडवली खर्च, स्थिर व जंगम मालमत्ता व प्रगती पथावरील

भांडवली कामे याकरिता या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेल्या तरतुदी नुसार यावर्षी महसूल जमा हा 34 कोटी, 31 लक्ष 65 हजार रुपये तर भांडवली जमा हा 88 कोटी 23 लक्ष आहे असा एकूण महसूल व भांडवली जमा हा 122 कोटी 54 लक्ष 65 हजार रुपये अपेक्षित आहे तर जमा महसुल मधून महसूल खर्च हा 33 कोटी 53 लक्ष 95 हजार रुपये तसेच एकुण भांडवली जमा मधून 87 कोटी 80 लक्ष रुपये खर्च होणार आहे

असा एकूण महसूल व भांडवल खर्च हा 121 कोटी 33 लक्ष 35 हजार रुपये राहणार आहे .यानुसार सन 2021-2022या आर्थीक वर्षाचे शिल्लकी अर्थसंकल्प अंदाजपत्रक हा 1 कोटी 21 लक्ष 30 हजार रुपयांचा आहे.या अर्थसंकल्पला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून हा अर्थसंकल्प सादर करताना नगर परिषद चे लेखापाल अमित खंडेलवाल, वरिष्ठ लिपिक धर्मेश जैस्वाल तसेच महिला लिपिक आश्विनि पिल्लारे यांनी मोलाची कार्यालयिन कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठीSource link

Leave a Reply

%d bloggers like this: