अग्निशमन विभागाचे अधिकारी/कर्मचारी सेवाभरती नियमांना राज्य शासनाची मंजूरी - Expert News

अग्निशमन विभागाचे अधिकारी/कर्मचारी सेवाभरती नियमांना राज्य शासनाची मंजूरी


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातील अधिकारी / कर्मचारी (वर्गीकरण, सेवा भरती व पदोन्नती) नियमांना शासनानी मान्यता प्रदान केली आहे.

अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे तत्कालीन सभापती ॲड संजय बालपांडे यांनी सांगितले की, अग्निशमन समितीनी ठराव मंजूर करुन मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाचे मंजूरी नंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाचे नगरविकास विभागाचे दि.१८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे.

ते म्हणाले की, हा प्रस्ताव मुख्य अग्निशमन अधिकारी श्री राजेन्द्र उचके यांच्या साहाय्याने तयार करण्यात आले होते. आता या प्रस्तावाला राज्य शासनाने स्वीकृती प्रदान केली आहे. यासाठी श्री बालपांडे यांनी माजी महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदार श्री. प्रवीण दटके, माजी महापौर श्री. संदीप जोशी, विद्यमान महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांचे आभार मानले आहे.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: