अब्ब्ब् शिवणी गावात झाला कोरोनाचा उद्रेक


– 110 ग्रामस्थांच्या कोरोना तपासणीत 59 रुग्ण आढळले कोरोनाबधित
गाव पातळीवर गाव करण्यात आले प्रतिबंधित,ग्रामपंचायत सरपंच सह एक ग्रा प सदस्य ही आढळले कोरोनाबाधोत

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने कामठी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून मागील फेब्रुवारीपासून ते आजपावेतो300 च्या जवळपास कोरोणाबधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दिवसेंदिवस कोरोनाबधित रुग्णासह मृत्यूसंख्या ही वाढीवर आहे.

त्यातच आज आलेल्या कोरोणाबधित अहवालानुसार 374 नागरिकांनी केलेल्या कोरोना चाचणी अहवालात 106 रुग्ण कोरोणाबधित आढळले त्यातच कामठी तालुक्यातील शिवणी गावात कोरोनाने उद्रेक केला असून 110 ग्रामस्थांनी केलेल्या कोरोना चाचणी तपासणी अहवालात तब्बल 59 रुग्ण कोरोणाबधित आढळले ज्यामध्ये खुद्द ग्रामपंचायत सरपंचासह एका ग्रा प सदस्यांचा सुदधा समावेश आहे मात्र ही बातमी गावात हवेसारखी पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी घेत तहसिलदार अरविंद हिंगे व बीडीओ अंशुजा गराटे यांच्या मार्गदर्शनार्थ ग्रामसेवक शैलेश तांडेकर यांनी गावात निर्जंतुकीकरण , सोडियम क्लोरिफाईड फवारणी ला गती देऊन गावपातळीवर गाव प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार कामठी तालुक्यातील शिवणी गाव हे कामठी शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असून गावातील लोकसंख्या ही 790 च्या घरात असून 8 ग्रा प सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत चा कारभार सरपंच व ग्रा प प्रशासन च्या माध्यमातून सांभाळत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता ग्रा प प्रशासन गावातील निर्जंतुकीकरण करणे, फवारणी करणे या सर्व उपाययोजना करुनही गावात कोरोनाचा उद्रेक झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तरीसुद्धा कोरोनाशी लढा देत संयम व धैर्य बाळगत नागरिकांनी प्रशासनाने मार्गदर्शीत केलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करून कोरोना परिस्थितीवर नियंत्रण साधण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




Source link

Leave a Reply