आता नागपुरातील पेट्रोलपंप सायंकाळी ७ पर्यंत खुले राहणार


नागपूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे शहरातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने घेतला आहे.

लॉकडाऊनमध्ये प्रशासनाच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली असून त्याप्रमाणात विक्रीवर परिणाम झाला आहे. याशिवाय पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारीसुद्धा कोरोना संसर्गाच्या भीतीने कामावर येण्यास तयार नाही. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणाले, राज्य शासनाच्या लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल पंप या वेळेत सुरू राहतील. आपत्कालीन वाहतूक सेवांसाठी तेल कंपन्यांतर्फे संचालित पंप सुरू राहतील. नागपुरात जवळपास ८५ पेट्रोल पंप असून तेल कंपन्या आणि पोलीस प्रशासनातर्फे संचालित १० पेट्रोल पंप आहेत.

पेट्रोल व डिझेल विक्रीत ६५ टक्के घसरण
गुप्ता म्हणाले, कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची सरासरी विक्री ६५ टक्क्यांनी कमी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी स्थिती सुधारला होती. प्रत्येक पेट्रोल पंपावर सरासरी ६५०० लिटरची विक्री व्हायची; पण आता ही विक्री सरासरी २५०० लिटरपर्यंत कमी झाली आहे.




Source link

Leave a Reply