कुलरचा वापर करतांना घ्या खबरदारी महावितरणचे नागरिकांना आवाहन


नागपूर: उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाडयामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला असून कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघात टाळणे गरजेचे आहे. प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे.

उन्हाळयात शॉक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका निर्माण होताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

कुलरच्या लोखंडी बाहय भागात वीज पुरवठा येऊ नये, यासाठी कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी. पाणी भरतांना कुलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा. कुलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा. बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप एअर लॉक अशा वेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालु पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे, या पद्धतीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे महावितरणकडून सांगण्यात आले.




Source link

Leave a Reply