के. टी. नगर रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था, लवकरच होणार लोकार्पण


आमदार प्रवीण दटके यांचे सहकार्य

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या के. टी. नगर रुग्णालयामधे या आठवड्यापासून कोविड रुग्णांचा उपचार करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. १०० खाटांच्या रुग्णालयासाठी आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून २५ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. आता हे रुग्णालय जनतेच्या सेवेत लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी दिला.

के. टी. नगरच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी डॉक्टर्स, नर्सेसची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री. दटके यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा व्यवस्था झाली आहे.

या वेळी माजी मंत्री डॉ. परिणय फुके, आमदार श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, सत्ता पक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन, माजी आरोग्य समिती सभापती श्री. वीरेंद्र कुकरेजा, धरमपेठ झोनचे सभापती श्री. सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, नगरसेवक श्री. विक्रम ग्वालबंशी, अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे इत्यादी उपस्थित होते.




Source link

Leave a Reply