कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा-तहसिलदार - Expert News
Nagpur

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा-तहसिलदार

Online Casino In India:Is It Here To Stay?
Written by Expert News

कामठी :- कामठी तालुका प्रशासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करित असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांनी स्वतःहून सामोरे येऊन आपली माहिती द्यावी,लक्षणे असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी व लसीकरण करण्यासंदर्भात मनात कुठलीही भीती व संभ्रम न ठेवता लसीकरन करून घ्यावे, जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल असे आव्हान कामठी चे तहसिलदार अरविंद हिंगे व कामठी पंचायत समिती च्या महिला गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी ग्रामीन भागात दिलेल्या संयुक्त भेटीतून घेतलेल्या मार्गदर्शन बैठकीत केले.

कामठी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप थांबविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरेपूर उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवाना बळी न पडता व मनात कुठलीही भीती न बाळगता व कुठल्याही प्रकारचा ताप किंवा इतर आजार अंगावर न काढता नजीकच्या कोविड सेंटर मध्ये जाऊन आपले योग्य उपचार करून घ्यावेत असेही आव्हान केले तसेच ग्रहभेटी देणाऱ्या आशा वर्कर वा स्वतः कडून स्वतःची ऑक्सिजन पातळी तपासनि करत राहावी तसेच ग्रामीण भागातील कढोली, कापसी यासारख्या कित्येक ग्रामपंचायतीला भेट देत आरोग्य सेवा व कोरोनाचा आढावा घेत योग्य ते मार्गदर्शन केले तसेच ग्रामस्थांशी बैठका घेत काळजी चर्चात्मक दृष्टिकोनातुन काळजी घेण्यासह प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले.Source link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: