कोरोना बाधितांना मदतीचा हात देत आहे यूटेल संस्था - Expert News
Nagpur

कोरोना बाधितांना मदतीचा हात देत आहे यूटेल संस्था

कोरोना बाधितांना मदतीचा हात देत आहे यूटेल संस्था
Written by Expert News

नागपूर : कोरोनाचा काळात रुग्णालयांमध्ये दाखल कोरोना बाधितांच्या नातेवाईकांसाठी मदत करायला स्वयंसेवी संस्था यूटेल मल्टीपरपज सोसायटी समोर आली आहे. युवकांचा संगठनेने आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये नागरिकांना, नातेवाईकांना दुपारचे व संध्याकाळचे जेवण, ताक, सैनीटाइजर इत्यादीची मदत केली आहे.

मनपा स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर यांनी हया संस्थेच्या पदाधिका-यांचे मनापासून कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक संस्थांनी रुग्णांना, नागरिकांना मदत केली होती.

या लॉकडाऊन मध्ये सुध्दा यूटेल मल्टीपरपज सोसायटीच्या युवकांनी समोर येऊन मदत करणे अभिमानास्पद आहे. संस्थेचे नवनीतसिंह भसीन, उपिंदर कौर भसीन, राजपाल सिंह छटवाल, रबजोतसिंह भसीन, प्रेम भोयर व डॉ. मल्लिका राणा यांच्या मार्गदर्शनात हे कार्य सुरु आहेSource link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: