क्रीडा समिती सभापतींनी केली मरारटोली फुटबॉल मैदानाची पाहणी - Expert News

क्रीडा समिती सभापतींनी केली मरारटोली फुटबॉल मैदानाची पाहणी


नागपूर : मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी बुधवारी (ता.२४) धरमपेठ झोन अंतर्गत रामनगर येथील मरारटोली फुटबॉल मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती लखन येरवार, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा धोटे, नगरसेवक प्रमोद कौरती, कमलेश चौधरी, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, समाजसेवक आत्माराम पांडे, फुटबॉल प्रशिक्षक सिद्धार्थ काळे, प्रशांत नारखेडे आदी उपस्थित होते.

शहरातील खेळाडूंना त्यांच्या हक्काचे मैदान मिळावे यासाठी शहरातील मैदानांची अवस्था सुधारून त्यांना खेळण्यायोग्य बनविणे आवश्यक आहे. या उद्देशाने क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी प्रभाग १४ मधील रामनगर येथील मरारटोली फुटबॉल मैदानाची पाहणी केली. या मैदानामध्ये अनेक सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

मैदान समतोल करणे, नेटसह दोन गोल पोस्ट लावणे, सुरक्षा भींत करणे, दोन स्प्रींकल गन लावणे, महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह तयार करणे, स्ट्रक्चरल पेंटिंग करणे, लँड स्केपिंग स्ट्रक्चरल गोल्फ बनविणे, नवीन चॅनल गेट बसविणे आदी सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रमोद तभाने यांनी यावेळी निर्देश दिले.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: