खापरखेडा परिसरात 100, 200 रु. च्या बनावट नोटांचे चलन


नागरिकांनी सावध राहण्याची गरज

खापरखेडा :- सावनेर तालुक्यातील खापरखेडा परिसरात बनावट नोटांचे चलन होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे . नोटांचे लेनदेन करताना नागरिकांनी सावध व जागरूक राहावे अशे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष शेखऱ कोलते यांनी आव्हान केले आहे .

शेखऱ कोलते यांना काल दुपारी खापरखेडा परिसराच्या बाजारात एका दुकानदाराला पैशे देतेवेळी दोनशे रूपयाच्या नोटवर शंका आली. यासाठी त्यांनी त्या नोटचे निरीक्षण केले असता त्यावर उजव्या बाजूला महात्मा गांधी यांचे पांढरे वाटरमार्क नव्हते , नोटवर सेफ्टी लाइन ही जाड़ नसून फक्त हिरव्या रंगाची प्रिंटिंग होती , सोबतच दुसऱ्या दोनशे नोटा व त्या नोटाच्या रंगात सुद्धा थोडा फरक दिसून आला. मागील तीन चार दिवसांपासून बाजारात खरेदी करत असल्याने तो दोनशे रुपयाचा नोट कुणी दिला असेल याची खात्री कोलते यांना करता आली नाही. त्यामुळे खापरखेडा परिसरात काही असामाजिक तत्व अश्या बनावट नोटा बाजारात चालवत असल्याची शंका निर्माण झाली आहे .

सध्या परिसरात लॉकडॉउन असल्याने शासनाच्या आदेशानुसार सकाळी सात ते अकरा पर्यंतच बाजार खुले असते , म्हणून दुकानदार व ग्राहक हे घाईत असतात . याचीच संधी साधुन काही असामाजिक तत्व अश्या बनावट नोटा बाजारात चालवत आहे . मोठे चलन असल्याने सर्वच दुकानदार व ग्राहक पाचशेच्या नोटा शक्यतो तपासणी करूनच घेतात , परंतु बाजारात गर्दी व सर्वानाच घाई असल्याने शंभर व दोनशे रूपयांच्या नोटांकड़ें मात्र कुणीही लक्ष देत नाही . नागरिकांची हिच मानसिकता हेरुन त्या असामाजिक तत्वाद्वारे शंभर व दोनशे रूपयांच्या बनावट नोटांवर जास्त भर दिला जात आहे , सोबतच चिकन मटन मार्केट , पेट्रोल पंप , सब्जी मार्केट , हॉस्पिटल व मेडिकल फार्मसी अशे गर्दीचे ठिकाण हे त्यांचे मुख्य टार्गेट असावे अशी कोलते यांनी शंका व्यक्त केली आहे .

नागरिकांनी यापुढे पाचशे , शंभर , दोनशे व पन्नास रूपयांच्या नोटा सुद्धा तपासुनच लेन देन करावे . जेणेकरून पोलीसांच्या फौजदारी कार्यवाहिला समोर जाण्याची वेळ आपल्यावर येवू नये . नोटा तपासतांना त्यांचा रंग, क्वालिटी व सेफ्टी लाईनकड़ें लक्ष द्यावे , सोबतच नोटांच्या उजव्या बाजूला महात्मा गांधी यांचे पांढरे वाटरमार्क असल्याची खात्री अवश्य करावी . अश्यावेळी काही संशय आल्यास पोलिसांना सूचना द्यावी , यामुळे गरीब नागरिक व दुकानदार यांचे आर्थिक नुकसान होणार नाही , अशे कोलते यांनी नागरिकांना आव्हान केले आहे .




Source link

Leave a Reply