खापरखेडा पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांची मुजोरी - Expert News

खापरखेडा पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांची मुजोरी


दोन कर्मचाऱ्यांवर चारशे रुपये दंड

खापरखेडा :- सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांद्वारे कार्यालयात कर्तव्यावर असताना मास्क न घातल्याची घटना काल दुपारी उघड़किस आली. कोविड 19 च्या गाइडलाइनचे उलंघन झाल्याने सामाजिक कार्यकर्ता शेखऱ कोलते यांच्या तक्रारीवरुन ग्राम पंचायत चिचोलीच्या पथकाद्वारे पोस्ट ऑफिसच्या दोन कर्मचाऱ्यांवर प्रति व्यक्ति दोनशे रुपये दंड लावण्यात आला आहे .

सामाजिक कार्यकर्ता शेखऱ कोलते हे काल दुपारी दोन वाजताच्या दरम्यान खापरखेडा पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्ट करण्यासाठी गेले असता त्यांना तिथे उपस्थित महिला कमर्चारी यमुना रामटकर या मास्क नाक आणि तोंडावर न लावता गळ्यात अटकवलेल्या दिसल्या. सोबतच तेथील कर्मचारी राहुल बागड़े यांनी मास्क घातलेलाच नव्हता . कोलते यांनी त्या दोघांना सार्वजनिक कार्यालयात कर्तव्यावर असून त्यांचा ग्राहकांशी थेट संपर्क येत असल्यामुळे त्यांना मास्क घालने बंधनकारक आहे , अशे सांगून मास्क घालण्याची सूचना केली, परंतु दोन्ही कर्मचाऱ्यांनी कोलते यांच्या बोलन्याकडे जानिवपूर्वक व मुजोरीवजा दुर्लक्ष करीत मास्क घालने टाळले.

कोलते यांनी या प्रकरणाची वीडीओ शूटिंग व फोटो घेवून ग्राम पंचायतचे सचिव विजय लंगड़े यांना वाट्सअप द्वारे पाठवली आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्यास सांगितले. सचिव लंगड़े यांनी या तक्रारीची गंभीर दक्षता घेवून तातडीने पोस्ट ऑफिस गाठले व तेथील महिलां कमर्चारी यमुना रामटकर आणि राहुल बागड़े यांच्यावर प्रति व्यक्ति दोनशे रुपये दंड करून एकूण चारशे रुपये दंड वसूल केले व याची त्यांना रितसर पावती सुद्धा देण्यात आली .

शासकीय व सार्वजनिक कार्यालयात कर्मचाऱ्यांद्वारेच कोविड 19 च्या गाइडलाईनचे सर्रास उलंघन होत असल्यामुळे कोलते यांनी या गंभीर प्रकरणविषयी नागपुर ग्रामीणचे मुख्य पोस्ट मास्टर, इंडिया पोस्टचे संचालक , जिल्हाधिकरी, विभागीय आयुक्त, तहसीलदार व पोलिस अधिक्षक यांच्याकडे ईमेलने तक्रार दाखल करून कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: