गांधीबाग झोनमध्ये नव्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ


सभापती श्रद्धा पाठक यांचा पुढाकार : नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नागपूर : कोव्हिड लसीचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा यासाठी आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येत आहे. गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक यांच्या पुढाकारातून बुधवारी (ता. ७) प्रभाग २२ अंतर्गत इतवारी शहीद चौक स्थित दाजी दवाखान्यात नव्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य सभापती संजय महाजन यांच्या हस्ते नव्या लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, झोन वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा, धनराज मेंढेकर, स्टाफ अधिकारी मिनाश्री हाडके, कर्मचारी अशोक दांडेकर यांनी कोरोना काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल भाजप भगवान महावीर-चिंतेश्वर वॉर्डच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मध्य मंडळाचे अध्यक्ष किशोर पलांदुरकर, नगरसेवक मनोज चापले, गुड्डु त्रिवेदी, दशरथ मस्के, बाला पळसापुरे, हरिश महाजन, नितीन खापरे, सोनू जैन सिंघई, पंकज कुकसे प्रामुख्याने उपस्थित होते.
Source link

Leave a Reply