गुरुवारी १५ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २९ एप्रिल) रोजी १५ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,३०,००० चा दंड वसूल केला.

धरमपेठ झोन अंतर्गत देव ट्रेड कॉम कॉम्पुटर, धंतोली यांना कोव्हिड नियमांचे उल्लंघन करण्याबददल रु २५ हजाराचा दंड करण्यात आला. तसेच लक्ष्मीनगर झोन अंतर्गत लोकमत चौक येथील मेट्रो स्कॅन यांना कोव्हिड नियमांचे उल्लंघन करण्याबददल रु १० हजाराचा दंड करण्यात आला.

पथकाने ५६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.




Source link

Leave a Reply