गुरुवारी २६ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ६ मे) रोजी २६ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,५०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

श्री हरबन सिंग समुंद्रे लालगंज, सुदर्शन नगर यांचेकडे लग्न समारंभात कोव्हिड – १९ नियमानुसार सोशल डिस्टन्स व मास्क चे उपयोग न करता १०० लोकांत समारंभ मध्यरात्रि सुरु होता त्यामुळे त्यांना ५० हजाराचा दंड लावण्यात आला.

तसेच कोव्हिड – १९ चे आदेशाचे उल्लंघन करणा-या मंगळवारी झोन अंतर्गत एकूण २ दुकाने सील करण्यात आली. यामध्ये प्रकाश डेअरी बाबा फरिद नगर, झिंगाबाई टाकळी व सुपर डायमंड सलुन सारदा चौक, अनंतरनगर या दुकानाचा समावेश आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Source link

Leave a Reply