Nagpur

जिल्हाधिकारी संदीप कदम यांची कंटेनमेंट झोनला भेट

जिल्हाधिकारी संदीप कदम यांची कंटेनमेंट झोनला भेट
Written by Expert News

भंडारा:- कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या भंडारा तालुक्यातील पांढराबोडी व चोव्हा येथील कंटेनमेंट झोनला आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड व तहसीलदार अक्षय पोयाम यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

कोरोनाचे रुग्ण असलेल्या ठिकाणी प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत. याठिकाणी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांकडून कोविड प्रोटोकॉल नियमांचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली.

उपविभागीय अधिकारी राठोड यांनी याबाबत माहिती दिली. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी गृह विलगिकरण कालावधीत बाहेर फिरणे अपेक्षित नाही. त्यामुळे अन्य व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. कोविड प्रोटोकॉलचे पालन अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.Source link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: